Skip to content
  • तुकाराम चिंतू भुजाडे
  • पाटिलपाडा
  • बाळापूर
  • विक्रमगड
  • पालघर
  • महाराष्ट्र
  • डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा.शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.
    औषधी गुणधर्म –
    * करवंद हा रानमेवा आहे, तो नसíगकरीत्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच, शिवाय आरोग्यासही हितावह आहे. सहसा मोठय़ा शहरांमध्ये हा रानमेवा मिळत नसल्यामुळे बरेच जण याच्या स्वादापासून व यातून मिळणाऱ्या पौष्टिक घटकांपासून वंचित राहतात.
    * रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
    * करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. तसेच ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
    * करवंदामध्ये मोठय़ा प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
    * सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
    * करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
    * अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
    * आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोडय़ा-थोडय़ा अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
    * करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
    * करवंदाच्या रसामध्ये मधुरता आणि आम्लता असल्यामुळे अपचन झाले असेल, तर अन्नाचे पचन होण्यासाठी करवंदाचे सरबत थोडय़ा थोडय़ा अंतराने पीत राहावे.
    * करवंदे वातशामक असल्यामुळे पोटात गुबारा धरला असेल तर करवंद सेवनाने पोट व आतडय़ांचे आरोग्य चांगले राहून वायूचे मलावाटे निस्सरण होते.
    * करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
    * करवंदामध्ये नसíगकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये करवंद सेवनाचा लाभ होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.
    * गर्भवतीने उलटी, मळमळ,ही भावना कमी होण्यासाठी व विपुल प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी ऋतूमध्ये मूठभर करवंदे खावीत.

1 thought on “करवंद”

  1. hey tһere ɑnd thank you for үour informatiߋn – Ι’ve certainly picked ᥙp anytһing new
    from rіght hеre. I did however expertise several technical issues ᥙsing thіs web site, since I
    experienced to reload tһе website many tіmеs pгevious tо I cօuld
    get itt to load properly. Ι had beеn wondering іf y᧐ur web hosting
    iѕ OᏦ? Not that І’m complaining, bսt slow loading instances tіmes will ߋften affect yоur placement іn google and
    ⅽould damage yօur high-quality score if advertising and
    marketing ԝith Adwords. Ԝell I’m adding tnis RSS tօ myy e-mail and coulԀ lo᧐k out fߋr ɑ ⅼot more of уour
    respective intriguing content. Ensure that үou update this again vеry s᧐on.

    Take a look att my site: buy mdma pills online

Leave a Reply to buy mdma pills online Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English