Latest Entries
आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात.
करवंदामध्ये असणारे औषधी गुणधर्म
– करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो.
– करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
– करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
– करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
– उन्हाचा त्रास होत असेल यामुळे, शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
– अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
– आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
– करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.

बहावा
आंबा, पळस, पांगारा, काटेसावर शिरीष,पिंपळ करवंद वड, उंबर ,चाफा इत्यादी वृक्ष पानं, फुलं, फळे बहरुन गेलेले आपण सह्याद्रीच्या परिसरात पाहिले असाच अजून एक वृक्ष म्हणजे “बहावा,”सोनेरी पिवळ्या धम्मक फुलांनी लक्ष वेधून घेणारा वसंतातील फुलोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणारा अजून एक वृक्ष म्हणजे ‘बहावा
बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो.
पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.
बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो.
बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.
फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते .