Skip to content

Latest Entries

आपल्या बालपणी कदाचित या जादूई फळाची चव आपण अनुभवली असेल.. आजही ते क्षण आठवतात.. सहयाद्रीच्या घाट माथ्यावर भटकताना भोकराचे फळ खाण्यास मिळते,.. अत्यंत शक्तीवर्धक , कृमिनाशक, खोकल्यापासुन आराम देणारे हे नैसर्गिक फळ आहे.. काही जण याचे चविष्ट लोणचे देखील तयार करतात.. असे हे पौष्टिक, बुळबुळीत चिकट रसांनी भरलेले फळ नक्की खावं!

Read more
kalyani Lele

मोह हा पानगळी औषधी, धार्मिक महत्वाचा वृक्ष असून याला आदिवासीचा कल्पवृक्ष असेही म्हणतात.

मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग बनवितात. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत ‘बटर ट्री’ म्हणतात.

मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ब जीवनसत्त्व असते. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की आदिवासी मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.

मोहाच्या पानापासून पत्रावळ्या तयार केल्या जातात तसेच गायी गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दुध देतात.

मोहाच्या फुलापासून पुरण-पोळी आणी इतर कांही खाण्यायोग्य पदार्थ बनवतात,  मोहाच्या हिरव्या फळाची भाजी करतात, पिकलेली फळे खातात याशिवाय औषधी आणी इतर अनेक उपयोगी असलेला देशी वृक्ष मोह..

मोह हा रेवती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे त्यामुळे नक्षत्रवनात याची लागवड केली जाते.

Read more
kalyani Lele

वैशाख वणव्याने तापलेली धरती.. 

पावसाची प्रतिक्षा, गर्भवती माती

उनाड रानवारा, गारव्याची झुळूक

येतील, बरसतील मेघ आता 

काजव्यांचा चमचमाट...

दीस उरले थोडे, होईल आषाढा सुरुवात !!

अशा या सृष्टीच्या मंतरलेल्या-मुग्ध वातावरणात, झाड-झाडोरा असलेल्या भागात हवेत जरा जास्तच आद्रता जाणवते. आता लवकरच काही दिवसात पाऊस येईल, जंगलात, रानात जमिनीच्या पोटात दडून बसलेली असंख्य बीजे अंकुरतील. कोवळे, लुसलुशीत, किरमिजी रंगांचे वीतभर लांब वाढलेले खरबी चाईचे कोंब जमिनीवर दिसू लागतात.

ऑगस्टच्या दरम्यान हिची वाढ पूर्ण होऊन हिला बार (मोहोर) लागतो. लांब-लांब मंजिऱ्यावर अनेक उपशाखांमध्ये लगडलेली, असंख्य फुले...लगडलेल्या माळीच्या मण्यासारखी. या चाईच्या मोहराची भाजी खाणे हा अनेकांचा पावसाळ्यातला नित्यक्रम. हि भाजी दिसायला माशांच्या अंड्यासारखी दिसते पण चवीला एकदम अंडा-भूर्जीसारखी लागते.

Read more
kalyani Lele

आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात.

करवंदामध्ये असणारे औषधी गुणधर्म

– करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो.

– करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.

– करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

– करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.

– उन्हाचा त्रास होत असेल यामुळे, शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.

करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.

– अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.

– आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.

– करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.

– करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असते.

Read more
Yogesh Nawale

बहावा

आंबा, पळस, पांगारा, काटेसावर शिरीष,पिंपळ करवंद वड, उंबर ,चाफा  इत्यादी वृक्ष पानं, फुलं, फळे बहरुन गेलेले आपण सह्याद्रीच्या परिसरात पाहिले असाच अजून एक वृक्ष म्हणजे “बहावा,”सोनेरी पिवळ्या धम्मक फुलांनी लक्ष वेधून घेणारा वसंतातील फुलोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणारा अजून एक वृक्ष म्हणजे ‘बहावा

बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो.

पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.

बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो.

बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.

फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते .

dnyaneshwar.pawar@baif.org.in Pawar
Read more
कमल मावंजी पवार
मराठी