Skip to content

सोनेरी वृक्ष बहावा

बहावा

आंबा, पळस, पांगारा, काटेसावर शिरीष,पिंपळ करवंद वड, उंबर ,चाफा  इत्यादी वृक्ष पानं, फुलं, फळे बहरुन गेलेले आपण सह्याद्रीच्या परिसरात पाहिले असाच अजून एक वृक्ष म्हणजे “बहावा,”सोनेरी पिवळ्या धम्मक फुलांनी लक्ष वेधून घेणारा वसंतातील फुलोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणारा अजून एक वृक्ष म्हणजे ‘बहावा

बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो.

पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.

बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘Golden shower tree’ म्हणून ओळखला जातो.

बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.

फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

English