सफेत फुलाचा बाहवा ( चोखा बाहवा )

  • गणपत चिमा पवार / रघु रामा गावंढा
  • वांगणपाडा
  • पाथर्डी
  • जव्हार
  • पालघर
  • महाराष्ट्र
  • बाहवा झाडा मध्ये दोन जाती आढळतात त्यातील एक पिवळ्या फुलाचा बाहवा हा मोठ्या प्रमाणात दिसतो व सफेत फुलाचा बाहवा हा दुर्मिळ झाला आहे.
    सफेत फुलाचा बाहवा याच्या फुलांची भाजी बनवितात. सुरवातीला फुले पाण्यात उकळून शिजवून घ्यावी नंतर पिळून त्यात हळद, मीठ, तिखट, गरम मसाला टाकून मिक्स करून त्याला मिरची व लसणाची फोडणी देऊन सुकी भाजी बनवावी.
    या झाडाच्या कोवळ्या पानाचा उपयोग आंबे पीकविण्यासाठी होतो त्या मुळे फळाला रंग येतो चव चांगली येते, टिकावू पणा वाढतो. याच्या शेंगाचा रात आंधळे पणावर उपयोग करतात. याच्या फुलांची भाजी खाल्याणी डोळ्यांचे आजार कमी होतात. तसेच या झाडाला फुले आल्यापासून दीड महिन्यांनी पाऊस येतो असे या भागातील शेतकऱ्यांचे मानणे आहे म्हणून त्याला पाऊसाचा अंदाज सांगणारे झाड असे म्हणतात. या झाडांची संख्या वाढविण्यासाठी बियापासून करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.