समुदाय – माडिया,
महिने – सप्टेंबर,
धान कापण्याआधी सरू साजरी केली जाते. या पूजे साठी शेतकरी भुम्याकडे(पुजारी) कडे जातात. पुजारी थोडेसे तांदूळ पूजून शेतकर्याकडे दिले जातात. शेतकरी ते तांदूळ शेतात घेऊन येतात. हे तांदूळ दोन ओंब्यांच्या मध्ये ठेवून येणाच्या पान आणि सालीच्या साहय्याने गुंडाळून घेतात. यांनंतर कापणीला सुरुवात करतात. या दिवशी कोंबडीच आणि बकरे यांचे बळी देऊन भोजन केले जाते. मोहाची दारू शेतकरी पितात.