समुदाय – माडिया,
महिने – सप्टेंबर,
संजोरापोलवा साजरा करण्याआधी गावातील लोक सामूहिकरित्या शिकरीसाठी जंगलात जातात. शिकार ही भुम्याच्या नावाने होत असते. जर शिकार झाली तर त्याच भुम्याला प्रमुख म्हणून गावात नेमतात. जर शिकार झाली नाही तर दूसरा भूम्या नेमला जातो. यात रानडुक्करची शिकार झाली तर हा अपशकुन मानला जातो. असे झाले तर गावात भुम्याच्या नावाने चांगले कार्य होत नाही, असा समज आहे. हरिण, सांबर आणि ससा या सारखे शिकार झाली तर शकुन मानला जातो. या शिकारीत महिला पुरुष दोघेही सहभागी होतात.