समुदाय – माडिया,
महिने – जून,
धान(भात) पेरणी करण्याआधी गावातील माऊली किंवा तल्लोमुत्ते येथे सर्व गावकरी सामूहिकरित्या जमा होतात व या ठिकाणी भूम्या/पेरमा यांच्या हस्ते विधिवत पुजा करून सर्वांना थोडे थोडे धान वाटप केले जाते. ते धान्य घेऊन शेतकरी आपल्या शेतात नेऊन शेतात खंदणी करून पेरतात, स्थानिक भाषेत यास येसा असे म्हणतात. या निमित्ताने डुक्कर. कोंबडीचे पिल्लू आणि बकरे यांचे बळी देऊन सामूहिकरित्या भोजन केले जाते. पूजेसाठी मोहाची, कस्सी च्या झाडाची पाने आणि मोहाची दारू वापरली जाते.