समुदाय – माडिया,
महिने – सप्टेंबर,
मक्का, अंबाडी आणि काकडी परिपक्व झाल्यावर हे खाण्याआधी त्यांची नोपुजा पुजा केली जाते. या पूजे साठी मोहाची पाने वापरतात. ही पुजा प्रत्येक घरी स्वतंत्र साजरी केली जाते. संध्याकाळी गोटुल मध्ये नाचगाणे होतात. दुसर्या दिवशी गावातील तरुण मंडळी घरातील कचरा गोळा करून गावाच्या वेशीबाहेर फेकतात, याला पीडा उतरवणे म्हणतात. यानिमित्ताने या तरुणांना भोझारा पैशाच्या स्वरुपात दिला जातो.