समुदाय – पावरा,
महिने – ऑक्टोबर – नोव्हेंबर,
आदिवासी पावरा समाजात इंदल हा सण साजरा केला जातो. शेतात काही पिकत नसेल किंवा घरात सुख शांती नसेल तर आदिवासी इंदल देवतेची पुजा केली जाते. यासाठी कोलामालाच्या(कळम ) फांद्या गाजत वाजत घरासमोर आणल्या जातात. नंतर तीन ठिकाणी खड्डा खोदुण त्या फांद्या बाजूने ज्वारी टाकून रोवल्या जातात. यानिमित्ताने प्रत्येक नातेवाईक एक बकरू भेट घेऊन येतो. त्या बकराचे निम्मे मांस नातेवाईकास वापस दिले जाते. यावेळी काही लोक मोहाची दारू भेट देतात. रात्रभर वांजंत्री लावून नाच सुरू असतो. तत्पूर्वी इंदल चे नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी भादुली आणि हळद पाहुण्याच्या दाराला लावली जाते किंवा दारात फेकली जाते.