समुदाय – माडिया,
महिने – मार्च,
होळी गावाच्या बाहेर सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते. यात जंगलातील लाकूड आणि सिंधीचे पाने यापासून म्हातारा-म्हातरीची प्रतिकृती तयार केली जाते. मधोमध बांबू उभा करून त्यावर भाताची पोळी लटकवली जाते. त्यानंतर सामूहिक पुजा करून होळी पेटवली जाते. पोळीला बंदूक किंवा गुल्याल(गलूल) ने होळीबाहेर पाडले जाते. त्या पोळीचा प्रसाद म्हणून वाटप केला जातो. सायंकाळी गोटुल मध्ये सामूहिक नाचगाणे होते. दुसर्या दिवशी फोदा करून वर्गणी गोळा केली जाते. त्याच वर्गणीतून कोंबडा, बकरा कापून जेवण केले जाते आणि मोहाची दारू पिली जाते.