समुदाय – माडिया,
महिने – डिसेंबर,
या पूजेसाठी बेलाची फळे, जंगली मटारू(कंदमुळे), बिबा आणि बांबूची टोपली, मोहाच्या पानाचे ढोपे(द्रोण) वापरतात. मोहाच्या सालाची बैलबंडी बनवतात. यावर बांबूची टोपली ठेवतात. त्या टोपलीत तांदळाच्या लहया टाकून नवीन कापडाचा झेंडा बांधतात. हे सर्व घरगुती तयार करून सामूहिकरित्या एकत्र आणतात, त्याची पुजा करतात. पुजा करून हे सर्व गावाच्या सीमेबाहेर ठेवून देतात. यानिमित्ताने कोंबडा, डुक्कर आणि बकरू यांचे बळी देतात. तसेच पूजेसाठी मोहाचे पान व मोहाची दारू असते. या सणासाठी फक्त पुरुष मंडळी असतात.