समुदाय – माडिया,
महिने – ऑगस्ट,
बैलपोळ्यासाठी जंगलातील पोरापुंगा चे फूल आणि गुप्पिड झाडाची साल बारीक करून बैलास सजवण्यासाठी वापरली जाते. तसेच साग वाण झाडाची फुलेही वापरतात. या दिवशी बैलास भात, भाजी आणि पुरी चा नैवेद्य दाखवला जातो. काटेवांजी धानाची चपाती आणि मोह टोरीच्या तेलाचा दिवा बैल पूजे साठी ठेवला जातो. सामूहिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढली जाते आणि माता मंदीरात एकत्र होतात. दुसर्या दिवशी मार्बत साजरी करतात. या दिवशी कोंबडीचे पिल्लू आणि बकरे यांचे बळी देऊन सामूहिकरित्या भोजन केले जाते. या निमित्ताने गावातील महिला-पुरुष उपस्थित असतात.