समुदाय – माडिया,
महिने – ऑक्टोबर,
जंगलातून आपट्याची पाने आणून संध्याकाळी गावात वाटली जातात. प्रत्येक गावातून चार पाच लोकांना अहेरी येथील राजपरिवाराच्या दर्शनासाठी जातात. घरगुती पूजेत दोडका, चवळीच्या शेंगा, कोवळा(भोपळा) येणाची पाने आणि मोहाची पाने पूजली जातात. यात तीन आडनावाची लोक एकत्र येऊन पुजा करतात. या दिवशी कोंबडीच आणि बकरे यांचे बळी देऊन भोजन केले जाते. मोहाची दारू शेतकरी पितात.