होळी (होळी)

  • Yogesh Nawale
  • अकोले
  • अकोले
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • समुदाय - हिंदू महादेव कोळी,
    महिने - मार्च,
    आदिवासी समाजात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहान होळी आणि मोठी होळी असे दोन उत्सव येथे साजरे केले जातात. यापैकी लहान होळी पहिल्या दिवशी साजरी केली जाते, लहान होळी म्हणजे होलिका ची लहान बहीण. या दिवशी उंबराची फांदी होळी पेटवण्यासाठी वापरतात. रात्री शेणाच्या गोवरी आणि भाताचा पेंढा होळी रचण्यासाठी वापरला जातो. भात, गव्हाची पोळी आणि दिवा असा नैवेद्य होळीला दाखवला जातो. याचप्रमाणे दुसर्‍या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते. या होळीला ऊंबराची फांदी वापरली जाते. या दरम्यान ग्रामस्थ होळीला प्रदक्षिणा घालून गाणे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published.