Skip to content

रामफळ-

By:

pradip bhoye

पाडा / Pada/ Hamlet

Kogda

खेडे / village

Kogada

तालुका / Taluka / Block

Jawhar

जिल्हा / District

Palghar

राज्य / State

MAHARASHTRA
Photograph of the tree

वृक्षाची माहिती व उपयोग / Details of tree and its uses

औषधी वनस्पतीचे नाव: “रामफळ औषधी गुणधर्म.” 👉 शास्त्रीय नाव: अॕनोना रेटिक्युलाटा (Annona reticulated) 👉 मराठी नाव: रामफळ 👉 इंग्रजी नाव:बुलक्स हार्ट (Bullocks Heart, Custard apple) 👉 हिंदी नाव: रायफल. 👉 कुळ: अॕनोनेसी ( Annonaceae) “रामफळ”या फळाच्या औषधी गुणधर्मा विषयी माहीती करून घेऊया. अपुरी व्यापारी लागवड असल्यामुळे,कुणाच्या घरी जास्त प्रमाणात लागली तरच रामफळे अल्प प्रमाणातच बाजारात विक्रीला येतात. पण जेव्हा केव्हा आपल्याला अशी फळे दिसतील तेव्हा ती जरूर घरी घेऊन जा आणि चाखून बघा. आपल्यापैकी अनेक जणांनी रामफळाची चव घेतली नसेल. सर्वांना आवडेल अशीच या फळाची चव अप्रतिम असते. खर सांगतो लहानपणी घरी रामफळाची मोठी लागती झाडे असल्याने ही फळे मी भरपूर खाल्ली आहेत, पण त्या वेळी या फळांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात असे कधीही वाटले नाही. अगदी काल परवा पर्यंत या विषयी मी काहीच विचारच केला नव्हता. की या फळाचे काही औषधी उपयोग आहेत का? या फळांमध्ये असणारे अनेक औषधी गुणधर्म वाचून अचंबित झालो आणि लिहायला घेतल. रामफळा विषयी अधिक थोडी माहिती आणि त्याचे औषधी गुणधर्म काय हे जाणून घेऊया. 👉 रायफल वृक्षाची थोडक्यात माहिती : 🌳 वृक्ष: रामफळ वृक्ष सदरात मोडणारी ही वनस्पती साधारणता 9 ते 15 मीटर उंच वाढते या वनस्पतीचे मूळस्थान वेस्टइंडीज मधील आहे. तेथे लोक या फळाला “बुलक हार्ट” म्हणतात. भारतात हा वृक्ष वेस्टइंडीज मधून आणला गेला. या फळा बरोबरच सिताफळ, हनुमान, आणि मामफळ या फळांच्या जाती देखील वेस्टइंडीज मधून भारतात आणल्या गेल्या आहेत. यापैकी सीताफळ हेच फळ त्याच्या उत्तम चवीमुळे अधिक लोकप्रिय झाले. बाकीची फळे फारशी लोकप्रिय झाली नाहीत. रामफळाची व्यापारी लागवड फारशी कुठे दिसून येत नाही. त्यामुळे हे फळ क्वचितच बाजारात दिसते. हा वृक्ष 9 ते 15 मीटर उंच वाढतो. खोड पांढरट कथ्थी किंवा तपकिरीरंगाची असते. फांद्या आणि लाकूड तसे कच्चे असते. जास्त वजन दिल्यास लगेच मोडते. वृक्षाला भरपूर पाने असल्यामुळे वृक्षाखाली नेहमीच दाट सावली राहते. पानगळती साधारणतः एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात होते. त्यामुळे वर्षभर या वृक्षाखाली दाट सावली राहते. 🌿पाने: पाने एक आड एक येतात. त्यांचा आकार आंबा, पेरूच्या पानांचा सारखाच असून ती कमी जाड असून जास्त रूप व लांब असतात. पण ती अधिक पातळ अससून लांबी साधारणतः १२ ते २० सेंमी. लांब आणि ७ते ८ सेंमी. रुंद असतात. पानांमध्ये एक उभी शीर असून त्यावर १७ते १८ आडव्या उपपरेशा असतात. पाने विषारी असतात.पानांवर कुठलीही किड दिसून येत नाही. कीटकनाशका सारखा पानांचा आणि बियांचा वापर करता येतो. पानांना एक विशिष्ट वास असतो. 🌸 फुले: फुले पावसाळ्यात येतात. फुले पानां शेजारी पेरावर उगवतात. फुले तीन ते चार च्या संख्येने येतात. सिताफळ फुलांपेक्षा रामफळाचची फुले मोठी असतात. हिरवट पिवळसर रंगाची त्रिपाठी असतात. दिसायला फुले सिताफळाच्या फुलासारखी सारखीच दिसतात. फुलांमध्ये सहा पाकळ्या असतात. 🍎फळेः हिवाळ्यात येतात.ती तुरळक प्रमाणात असतात. फळे पांढरट हिरवी सिताफळाच्या रंगाची असतात. फळे पिकल्यावर पिवळसर गुलाबी किंवा लाल-केसरी होतात. सर्वच फळे एकाच वेळी पिकत नाहीत. फळाचे वजन एक किलो पर्यंत असू शकते. फळांचा आकार हृदयासारखा असतो. फळ पंधरा ते वीस सेंमी.व्यासाचे, बैलाच्या हृदयाच्या आकाराचे फळ असते. म्हणून या फळाला “बुलक हार्ट “असे नाव पडले असावे. तयार फळांवर पंचकोन आकृती रेषा दिसतात. नामकोषाने म्हणूनच याचे नाव रेटिक्यूलाटा दिले असावे. फळाची साल पातळ असते. गर सिताफळा पेक्षा पातळ असतो तसेच तो कमी गोड व ठिसूळ रवाळ असतो. फळांचा गर रवाळ कमी गोड असतो. जो थोडा आंबूस गोडअसतो.फळे वसंत पंचमी नंतर गुढीपाडवा ते रामनवमी च्या दरम्यान पिकतात. फळांमध्ये काळपट टणक गुळगुळीत बिया असतात. सिताफळा पेक्षा रामफळांमध्ये गर जास्त आणि बिया कमी प्रमाणात असतात. 🍪 बीया: बिया काळपट तपकिरी गुळगुळीत लांबुळक्या अगदी सिताफळाच्या बियांचा सारख्या दिसणाऱ्या असतात. बियांचे कवच अतिशय टनक असते, जे सहजासहजी फुटत नाही. बिया ह्या विषारी असतात. * बीया- पाने विषारी असल्याने त्यांचा वापर कीटकनाशक म्हणून करता येतो. या झाडावर कुठल्याही प्रकारची कीड दिसून येत नाही. * या बियांपासून रोपे तयार करता येतात . रामफळाची अभिवृद्धी मृदूकाष्ट कलम किंवा डोळे भरून देखील कलम करता येते. *रामफळाच्या लागवडीसाठी काळी कसदार सुपीक जमीन उत्तम असते. * कोकणात थोड्याफार प्रमाणात रामफळाची झाडे दिसून येतात. विदर्भात तुरळक प्रमाणात राम फळाची झाडे आढळतात. 👉 रासायणिक घटक: राम फळांमध्ये भरपूर प्रमाणात एंटिऑक्सीडेंट,व्हिटामिन ए व्हिटामिन सी ,कॅल्शियम ,फॉस्फरस आणि लोह असते. राम फळांमध्ये फायटोन्यूट्रिएन्टस कमालीचे असतात. हे घटक शरीरात प्रतिकारशक्ती (इम्युनिटी ) तयार करतात, त्यामुळे इतर विषाणूपासून किंवा विषाणूंचे संक्रमण रोखण्यास रामफळ अत्यंत उपयुक्त असते. एंन्टिइन्फ्लमेटरी, एंन्टिमायक्रोबियल, एंन्टिग्लायसेमिक, फायबर, व्हिक्टोरिया बी६ असे विविध घटक असतात. रामफळाच्या कोवळ्या फांद्यांमध्मे टॉनिन असते तर फळांच्या सालीमध्ये आॕनोनाइन अल्कोलाईड असते. या गुणामुळे रामफळाचे औषधी गुणधर्म वाढतात. 👉रामफळाचे औषधी गुणधर्म: रामफळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, याचे ज्ञान, मला त्याविषयाचे अधिक वाचन केल्यावरच कळले. त्या औषधी गुणधर्मांची माहिती आपल्याला येथे थोडक्यात देत आहे 📌रोग प्रतिकार शक्ति (इम्युनिटी) वाढविण्यासाठी: रामफळा मध्ये एंटीऑक्सीडेंट, व्हिट्यामिन सी, व्हिट्यामिन बी 6,एंटिइन्फ्लेमिटरी गुण, फायटोन्यूट्रिएंट्स, फॉस्फरस, कॅल्शियम लोह, हे कमालीचे असतात. रामफळाच्या सेवनाने शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. ते अगदी करोना विषाणूंना देखील शरीर प्रतिकार करू शकते असे संदर्भ सापडतात. 📌डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त : डोळ्यांचे विविध आजार, दृष्टीत वाढ करण्यासाठी रामफळाचे सेवन फारच उपयुक्त असते. कारण रामफळांमध्ये व्हिट्यामिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे व्हिट्यामिन बी २ पण यात असते, यामुळे डोळ्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर रामफळाचे सेवन फारच उपयुक्त ठरते. असे संदर्भ आहेत. 📌 मधुमेहाची जोखीम कमी राखण्यास उपयुक्त: रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी रामफळाचे सेवन उपयुक्त असल्याचे संदर्भ आहेत. या फळात असणारे एंटिहायपरग्लायसेमिक हे रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. प्रिडायबेटीक लोकांनी या फळाचे सेवन केल्यास त्यांना मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होते,असे संदर्भ आहेत. 📌पचनसंस्था योग्य राखण्यासाठी उपयुक्त : रामफळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचन योग्य प्रकारे होते. तसेच मॅग्नेशियम हे असल्याने अपचन आणि बद्धकोष्टता यात सुधारणा होऊन पचन सुलभ होऊन, पचनसंस्था योग्य राहण्यास मदत होते, असे संदर्भ सांगतात. 📌कॅन्सर पासून संरक्षण आणि उपचारासाठी उपयुक्त : राम फळांमध्ये फायटोकेमिकल्स हे भरपूर असतात. रामफळात असणारे एंटिऑक्सिडंट हे फ्री रॅडिकल्स (रोगाबरोबर)बरोबर लढतात आणि शरीरातील निरोगी पेशीचे संरक्षण करतात. तसेच नविन रोगट पेशींची निर्मिती थांबविले. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ब्रेस्ट कॅन्सर मध्ये रामफळ सेवन फायदेशीर आढळून आले आहे. 📌 चेहर्‍यावरचे मुरूम दुर करण्यासाठी उपयुक्त : रामफळांमध्ये एंटीमायक्रोबियल गुण असल्याने त्याच्या सेवनाने चेहऱ्यावर मुरूम तयार करणाऱ्या बॅक्टेरियायांना रोखले जाते आणि त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची निर्मिती होत नाही. 📌 अल्सर कमी करण्यासाठी उपयुक्त : रामफळाचे सेवन अल्सर कमी करण्यास उपयुक्त असून हिरड्या वरील सूज कमी करण्यास मदतगार असल्याचे संदर्भ आहेत. त्यासाठी रामफळाची साल फायदेशीर असल्याचे संदर्भ सापडतात. 📌 हृदयरोग दुर ठेऊन रक्तदाब योग्य राखण्यासाठी उपयुक्त : रामफळाचे सेवन हे हृदयरोग दूर ठेवून रक्तदाब योग्य राखण्यास उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. रामफळात भरपूर असणारे नायसिन आणि फायबर तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयरोगात फायदेशीर ठरतात. नायसिन आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करून, त्यात असणारे व्हिट्यामिन बी 6, हृदयरोगाची शक्यता कमी करतात आणि एकंदरीत हृदयाचे स्वास्थ्य योग्य राखण्यास रामपळाचे सेवन मदत करतात. 📌 राम फळाचे सेवन वजन वाढविण्यासाठी,उच्च रक्तदाब योग्य राखण्यास, गर्भपात रोखण्यास आणि प्रसूतीनंतर दूध न येणाऱ्या स्त्रियांमध्ये दुधाची वाढ करण्यास उपयुक्त असल्याचे तसेच त्वचेच्या आणि केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आल्याचे संदर्भ आहेत. 👉 रामफळाचे काही वाईट परिणाम : 📌 रामफळाच्या बीया आणि पाने विषारी असून विषबाधा होऊ शकते. चुकून बी गिळण्याचने काही होत नाही, कारण बियांचा बाह्य कवच खूप कठीण आणि टणक असते ते पोटात फुटत नाही अन् दुसऱ्या दिवशी शौच्यावाटे बाहेर पडते. पण बी फोडून खल्लास विषबाधा होते. 📌 ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रामफळ खाऊ नये कारण रामफळ खाल्ल्याने वजन वाढते असे संदर्भ आहे

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English