Skip to content

पळस

By:

योगेश नवले

पाडा / Pada/ Hamlet

देवगाव

खेडे / village

देवगाव

तालुका / Taluka / Block

अकोले

जिल्हा / District

अहमदनगर

राज्य / State

महाराष्ट्र
Photograph of the tree

वृक्षाची माहिती व उपयोग / Details of tree and its uses

पळस पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो. महाराष्ट्रात हिवाळ्यात (डिसेंबर-जानेवारी) फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३) या दिवशी याचे पत्रावळींचा वापर जरूर होतो. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो सपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते . साधारण थंडीची सुरुवात झाली की पळसाची झाड निष्पर्ण व्हायला सुरुवात होतात. हळूहळू ते बिचारं वठलेलं झाड मरून गेलं असेल असं आपण म्हणे म्हणेस्तो एकदम मळकट रंगावर लाल केशरी कडा जाणवायला सुरुवात होते नी अचानक, पळस रंगोत्सव सुरु करतो. केशरीया लालूस रंगाची नारिंगी छटेकडे झुकणारी मोठी झुपकेदार फ़ुलं अंगावर मिरवायचा झाडाचा हा पुष्प सोहळा जवळजवळ महिना दिड महिना सुरुच रहातो. पळसाच्या प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या शेंगाना पळसपापडी असे म्हणतात. ह्या झाडाच्या बिया रुजायला साधारण पंधरा दिवस लागतात. वैशिष्ट्य म्हणजे, साठवायच्या म्हंटल तरी वर्षापेक्षा जुन्या बिया रुजत नाहीत. साधारण पंधरा मिटर्सपर्यंत उंच वाढणारा पळस अगदी घनदाट या सदरात कधीच मोडत नाही. साधारण सहा मिटर्स व्यासात याचा पसारा पसरतो. पळसाचं झाड कधीच सरळ अथवा डेरेदार न वाढता, वेड्यावाकड्या आकारात वाढतं. याची साल तपकिरी करडट रंगाची नी तंतूमय असते. रखरखीत असलेल्या या सालीतून कधीकधी चक्क लालसर रंगाचा चिक स्त्रवतो. या लालसर चिकापासून डिंक बनवला जातो. ह्या डिंकाचा वापर कातडे कमवण्यासाठी केला जातो. आता ’पळसाला पाने तीन’ ही सुप्रसिद्ध म्हण ज्या पानांवरून जन्माला आलीय ती पानं कशी असतात? हा प्रश्न कुणाच्याही मनात लगेच डोकावू शकतो. ही पळसपानं मोठी, वातड जाड , एकांतरीत असतात. पानाचा देठ साधारण पंधरा सेमीपर्यंत वाढतो. या देठाला तेवढ्याच म्हणजे साधारण दहा ते पंधरा सेमी लांबीच्या तीनच पर्णिका येतात. मधली पर्णिका कायम सगळ्यात मोठीच म्हणजे दहा ते पंधरा सेमी लांब असते. बाकी दोन साधारणदहा ते पंधरा सेमी असतात. ह्या पर्णिका ठळक काळपट हिरवट असतात. ह्या पानांचा उपयोग द्रोण , पत्रावळी बनवण्यासाठी व गुरांना चारा म्हणुनही केला जातो. पळसाची फ़ुलं म्हणजे ह्या झाडाचा मानबिंदूच म्हणावा लागेल. साधारण थंडीच्या अखेरीस ह्या झाडाचं फ़ुलणं सुरु होतं. सह्याद्रीत, कोकणात तर चक्क हे झाड कित्येकदा नोव्हेंबरातच फ़ुलायला सुरुवात करतं. लाल रंगाच्या विविध छटांमधली ही फ़ुलं काही प्रमाणात वाकडी वळलेली असतात, अगदी पोपटाच्या चोचीसारखीच. घोसात येणाऱ्या या फ़ुलांचे तुरे साधारण चाळीस सेमी लांब असतात. या फ़ुलांच्या पाकळ्या मोठ्या म्हणजे सहा सात सेमी असतात. याचा पुष्पकोष काहीसा मांसल काळपट मखमली रंगाचा असतो.या चित्ताकर्षक लाल रंगछटांच्या फ़ुलांमध्ये प्रत्येकी दहा पुंकेसर असतात ज्यातले नऊ जोडलेले असतात. फ़ुलाच्या तळाशी पाच मकरग्रंथी म्हणजेच नेक्टरीज असतात. यात तयार होणारा मधुरस प्यायला पक्षी,खारी नी भुंगे अगदी गर्दी करतात.माकडं तर फुलांच्या जोडीला या झाडाची कोवळी पानं आणि शेंगापण खातात.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

English