समुदाय – पावरा,
महिने – ऑगस्ट -सप्टेंबर,
मकाचा मोहरम(मोहोर) आला की नवाई साजरी केली जाते. मकानेच हे नवाईचे पूजन केले जाते. काकडीची भाजी केली जाते आणि प्रत्येक देवाला नैवेद्य म्हणून दिले जाते. हे सगळी देव ग्रहण करतात, अशी येथे श्रद्धा आहे. हे पूजन पूर्ण झाल्यानंतर बैलांना, गाई-बकरांना कणसे बाफवून खायला दिली जातात. त्यानंतर आहारात मकाचा अन्न म्हणून वापर केला जातो.