समुदाय – पावरा,
महिने – मार्च,
होळी पेटवण्यसाठी बांबूंचे चे लाकूड मध्यवर्ती ठेवले जाते. होळी पूजनासाठी पाच जातीचे अन्न एकत्र गोळा करून पूजले जाते. यात ज्वारीचे आद्यपूजन करून होळीला पूजले जाते. होळी पेटवण्यासाठी टेम्भुर्णी झाडाची वाळलेली फांदी वापरली जाते. तीन दिवसाने होळीला सातपुडी या स्थानिक कोंबडीचा बळी दिला जातो. नंतर त्याचे जेवण बनवून प्रसाद म्हणून वाटप केली जाते.होळी पेटवून झाल्यावर बांबूंचा शेंडा पोलिस पाटील कापतो आणि त्याच्या घरी गावप्रमुख म्हणून ठेवला जातो. तिथेच गावकर्यांना जेवण दिले जाते.