समुदाय – हिंदू महादेव कोळी,
महिने – ऑक्टोबर,
आदिवासी लोक चालीरीतीप्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस वाघबारस म्हणून साजरा करतात. वर्षभरात केलेले नवस फेडण्यासाठी गावाच्या वेशीवर असलेल्या वाघोबाच्या मूर्तीची पूजा करतात. हा सण मोठ्या उत्सवात सर्व गावकरी साजरी करतात. जंगलातील हिंस्त्र प्राण्यापासून पाळीव प्राण्याची जसे की गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा,बोकड चा नैवेद्य दाखवला जातो. तसेच तांदळाच्या खिरीचा नैवेद्य वाघोबास दाखवतात. वाघबारस च्या आधी गुराखी गावातून प्रत्येक घरातून तांदूळ गोळा करतो, गूळ आणि गुरे गोळा करून मंदिराच्या परिसरात पूजेसाठी घेऊन येतो