समुदाय – पावरा,
महिने – जून,
जून महिन्यात स्थानिक वाघदेवतेची पुजा केली जाते. गाई गुरांना वाघाने किंवा इतर जंगली प्राण्यापासून हल्ला होऊ नये म्हणून वाघपूजन केले जाते. या पूजेसाठी ज्वारी धान्य वापरले जाते. प्रत्येक घरातून अर्धा किलो ज्वारी गोळा करतात. जो पुजारी वाघपूजन करतो, त्याला गोळा केलेली दक्षिणा म्हणून दिली जाते. वाघदेवतेला बकर्याचा बळी दिला जातो. सर्व मांसाचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. या पूजेसाठी बेलाच्या आणि सागाच्या झाडाची पाने वापरली जातात. तीच पाने जेवणासाठी पत्रावळ म्हणून वापरली जाते