समुदाय – हिंदू महादेव कोळी,
महिने – ऑगस्ट,
बैलपोळ्याच्या दिवशी बैलाना सजवण्यासाठी चवार वापरले जाते. हे चवार उंबराच्या आणि पळसाच्या झाडाच्या मूळीपासून ठेचून दोरीसारखे धागे काढले जाते. या दिवशी बैलांची गावातील मारुतीच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. तिथे स्थानिक धान्य भाताचा,पूरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो,नारळ फोडला जातो. घरी बैल आल्यावर त्यांना पूरणपोळी आणि भाताचा नैवेद्य दिला जातो.