Skip to content

विज्जा पांडुम

By:

Rakesh Durge

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

एटापल्ली

जिल्हा / District

गडचिरोली

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – माडिया, महिने – जून, धान(भात) पेरणी करण्याआधी गावातील माऊली किंवा तल्लोमुत्ते येथे सर्व गावकरी सामूहिकरित्या जमा होतात व या ठिकाणी भूम्या/पेरमा यांच्या हस्ते विधिवत पुजा करून सर्वांना थोडे थोडे धान वाटप केले जाते. ते धान्य घेऊन शेतकरी आपल्या शेतात नेऊन शेतात खंदणी करून पेरतात, स्थानिक भाषेत यास येसा असे म्हणतात. या निमित्ताने डुक्कर. कोंबडीचे पिल्लू आणि बकरे यांचे बळी देऊन सामूहिकरित्या भोजन केले जाते. पूजेसाठी मोहाची, कस्सी च्या झाडाची पाने आणि मोहाची दारू वापरली जाते.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video

मराठी