Skip to content

बांबू ची भाजी व लोणचे ( शिंद )

By:

चंदू लाल्या वायेडा

पाडा / Pada/ Hamlet

कांदलीपाडा

खेडे / village

गांगणगाव

तालुका / Taluka / Block

डहाणू

जिल्हा / District

पालघर

राज्य / State

पालघर

भाजीची माहिती / Details of the vegetable

शास्त्रीय नाव :- Bambusa arundinacea कुळ . :- Poaceae *बांबूचे औषधी उपयोग* बांबूचे इमारती व कागद निर्मिती साठी व्यापारी मूल्य आहे सोबतच ही वनस्पती औषधी गुणधर्मही आहे. १) बांबूचे मूळ, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात २) बांबू हे कफ क्षय आणि दम्यात अत्यंत उपयोगी आहे. ्च््च्च्््च््च्च््च्च््््च््च्च्््च््च््च्च्््च््च्च््च्च््््च््च्च्््च ३) बांबूच्या कोवळ्या कोंबचा किंवा कोवळ्या पानांचा काढा गर्भाशयाचे संकोचन होण्यासाठी बाळंतपणात देतात यामुळे विटाळ पडतो व विटाळ स्त्राव नियमित होतो ४) गुरांना अतीसारात बांबूची पाने व काळी मिरी मिठाबरोबर देतात ५) कोवळे कोंब कुटून संधेसुजित बांधतात * बांबूच्या कोंबा ची भाजी* पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात तेव्हा ते कोवळे असतात हेच कोंब भाजी करण्यासाठी योग्य असतात हे कोंब सोलून त्यावरील टणक आवरणे काढून टाकावीत आपले नख खूपसता येईल असा आतला कोवळा भाग काढून घ्यावा, तो पाण्याने धुवावा. बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावा. त्याला असणारा उग्र वास यामुळे कमी होतो तो मऊ देखील होतो.यासाठी आदल्या रात्री कोंब चिरून ठेऊन दुसऱ्या दिवशी भाजी करावी. आदिवासी भागातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, तालुक्यातील आदिवासी बांधव बांबूच्या भाजीसोबतच बांबूचे लोणचे तयार करतात . बांबूच्या कोवळ्या कोंबच्या गाभ्याच्य चकत्या करून पाण्यात भिजवून ठेवतात वर्षभर राहण्यासाठी मिठाच्या पाण्यात घालून ठेवतात व मग त्याचे लोणचे घालतात. साहित्य :- दोन वाट्या बांबूच्या चकत्या, चार लिंबू, दहा ते बारा बारीक चिरलेल्या मिरच्या, वाटीभर आल्याच्या चकत्या,100 ग्रॅम मोहरीची डाळ,100 ग्रॅम मेथी, एक वाटी मीठ व पाव लिटर तेल, दोन चमचे हिंग व चमचाभर हळद याचे मिश्रण करून घ्यावे व मिक्स करून दोन तासा नंतर बरणीत भरावे आठ दिवसांनी मुरल्यावर खाण्यास तयार होते.

भाजीचा ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video of vegetable

मराठी