Skip to content

घायपात

By:

मावनजी पवार

पाडा / Pada/ Hamlet

चौक

खेडे / village

चौक

तालुका / Taluka / Block

Jawhar

जिल्हा / District

Palghar

राज्य / State

Palghar

भाजीची माहिती / Details of the vegetable

घायपात या वनस्पतीचा उपयोग भाजी साठी केला जातो कोवळ्या खोडाचा व फुलांचा भाजीसाठी वापर केला जातो. १) कोवळे खोड पातळ कापून घ्यावे (सिंद करणे)त्या नंतर रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवावे सकाळी साध्या पाण्यात चांगले धुवून घ्यावे. नंतर मीठ, तिखट, हळद, गरम मसाला चवीनुसार घेवून चांगले मिक्स करावे व नंतर तेलात लसूण पाकळ्या,मोहरी याची फोडणी द्यावी. पाणी टाकू नये चांगले १० मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे आणि मग खाण्यासाठी वापरावे. २) फुलांची भाजी तयार करण्या साठी आधी फुले गरम पाण्यात उकळून घ्या व नंतर गरम पाणी काढून टाकावे आणि फुले चांगली पिळून घ्यावी त्यानंतर तेलात लसूण पाकळ्या मिरची याची फोडणी द्यावी नंतर मीठ, तिखट, हळद, गरम मसाला चवीनुसार घालून त्याची सुकी भाजी तयार करतात. ३)घायपात याच्या पानांचा उपयोग कुंपण बांधणे,घराचा कुड बांधणे, उडीद, भात, तूर या पिकांची कापणी झाल्यावर भारे बांधण्यासाठी केला जातो. ४) खोडाची पक्वता झाल्यावर त्याचा वापर शेतावर झोपडी करण्यासाठी केला जातो कारण त्याचे खोड मजबूत असते ते वाळल्यावर पाण्यात सुद्धा खराब होत नाही. ५)याच्या फुलाची भाजी आहारात नियमितपणे घेतल्यास मुतखडा आजार बरा होतो. ६) घायपाता च्या पानाला काटे असतात त्यामुळे त्याचा उपयोग शेताच्या कडेला जिवंत कुंपण म्हणून लागवड करतात.

भाजीचा ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video of vegetable

मराठी