पिंडीपंडूम

By:

Kailesh Kumare

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

एटापल्ली

जिल्हा / District

गडचिरोली

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – माडिया, महिने – डिसेंबर, आदिवासी बहुल भागात विशेष करून प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे.त्यातच पिका संदर्भातील सणांना विशेष महत्व आहे.या भागातील लोकांचा मुख्य पिक भात असल्याने भात पिकाची काढणी झाल्यावर पिंडी पंडूम हा विधी केल्या जातो.प्रत्येक गावात वेगवेगड्या दिवशी आपल्या सोयीने पांडूम साजरा केला जातो.पिंडी पांडूम करण्या आधी गाव बैठक घेतल्या जाते.यामध्ये गावातील भूमिया,पाटील,पेरमा व गावकरी हि सगडी मंडळी असतात.सर्वानुमते पांडूम ची तारीख ठरविण्यात येते.व प्रत्येक घरातून ५० ते १०० रु,तसेच तांदूळ जमा करण्यात येते.जमा झालेल्या पैस्यातून कोंबडे,डुक्कर,बकरे,ई खरेदी करतात. दुसर-या दिवशी महिलांनी बांधलेला बांबू व त्याला बांधलेली किल्ले आणि अंगठ्या तरुण मुले उडी घेऊन तोडण्याचा प्रयत्न करतात.अस्या प्रकारे हा पिंडी पांडूम साजरा केला जातो.दुसर-या दिवसापासून नवीन धान्य दळून खाण्यास सुरवात करतात. ठरल्याप्रमाणे एनाच्या झाडाजवळ(ताल्लो मुत्ते)पेरमा कडून पूजा केली जाते.महिला रस्त्यावर दोर धरून लोकांकडून वर्गणी गोळा करतात.काही महिला कसी मर्रा चे पाने विणतात,जवळ-जवळ १५ ते २० फुट पर्यंत विणतात याला (किल्ले )म्हणतात. त्या नंतर गावत मध्य भागी बांबू गाढून हे किल्ले व त्यात १० ते १२ अंगठ्या बांधून ठेवतात.महिला दुपारच्या वेळेस नवीन भाताचे पोहे सर्व मिळून वाटून खातात. त्यानंतर महिला जंगलात जाऊन लाकड आणतात व गावात चौकात मध्य भागी ठेवतात.इकडे पुरुष मंडळी पूजा झाली कि,कोंबडे,बकरे,डुक्कर यांची बळी देतात व स्वयंपाक करतात.व सामुहिक भोजन करतात.यात महिला नसतात,फक्त पुरुष मंडळी असतात.त्यानंतर रात्रीच्या वेडेस गावत मध्य भागी महिलांनी गोडा करून आणलेल्या लाकडांना आग लावल्या जाते व त्याच्या भोवताल रेला नृत्य केल्या जाते.यात महिला व पुरुष मिळून नृत्य करीत असतात.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video