आखाती(अक्षयतृतीया) सण

By:

सुनिल चैत्या राजड

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

गांगनगाव

तालुका / Taluka / Block

डहाणू

जिल्हा / District

पालघर

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

आखाती हा सण मराठी महिन्यांप्रमाने वर्षाचा शेवटचा सण आदिवासी बहुल क्षेत्रात गुजरात सीमेलगत कळवण, पेठ, हरसूल,सुरगाणा,जव्हार, मोखाडा, विक्रमगड,डहाणू.तालुक्यात आखातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आखाती सणा च्या सात किंवा नऊ दिवस अगोदर बांबू पासून विणलेल्या व शेणाने सारवलेल्या एका लहान टोपली (दुरडी) मध्ये माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य पेरले जाते. यात भात, नागली,वरी,मका,उडीद. ई.धान्याचा समवेश असतो.धान्य पेरलेल्या टोपलीला “गौर”/गौराई” असे म्हणतात.त्यानंतर पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात,या गौराई ला सूर्यप्रकाश व हवा लागू नये म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली (झिला) खाली झाकून ठेवतात.म्हणजे रोप हिरवी न होता पिवळ्या रंगाची होतात. या काळात रात्रीच्या वेळी वृद्ध महिला गौराईचे गाणी म्हणतात. आखाती (अक्षयतृतीया) सणाच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते,या मिरवणुकीमध्ये स्त्रिया, वृद्ध महिला,व मुली गौराईची गाणी सांगतात.व गावाजवळील नदी,तलाव किंवा विहिरीवर नेतात व तेथे पूजा करतात व पाण्यात विसर्जन करतात.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video