Drumstick ; शेगुट ;शेवगा

By:

Khandu bhoru shid

पाडा / Pada/ Hamlet

Pachghar, all mokhada tahasil

खेडे / village

Pachghar

तालुका / Taluka / Block

Mokhada

जिल्हा / District

Palghar

राज्य / State

Palghar

भाजीची माहिती / Details of the vegetable

शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारचीच जमीनच असावा अस काही नाही, हलक्या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्य आहे शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेने कमी आहे. शेवगा लागवडी संबधी: शेवगा लागवडीसाठी जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, या वेळी हवेतील आर्द्रता वाढते. जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील कमी असते. अशा वेळी रोपांची लागवड केल्यास रोपे उगवण्यास अनुकूल वेळ असते. शेवगा लागवड करण्यासाठी पाऊस पडण्याच्या अगोदर दोन फुट लांब, रुंद आणि खोल खड्डे खोदावेत व रोपे लावावीत. शेवग्याची रोपे जर बियांपासून अभिवृद्धी केलेले असतील तर मातृवृक्षातील अनुवांशिक गुण (True to Type) झाडे मिळत नाहीत तसेच फळ धारणा देखील शाखीय पद्धतीने केलेल्या अभिवृद्धीपेक्षा 3-4 महिना उशीरा होते. काढणी व उत्पादन: शेवग्याची लागवड केल्यापासून 6 महिन्यानंतर शेंगा लागतात. शेवगा शेंग रसरशीत असतानाच तोडणी करावी खूप टणक झाल्यास शेंगाची चव कमी होते. प्रत्येकी झाडापासून वर्षाला 50 किलो पर्यंत शेंगा मिळतात. तसेच मोखाडा सारख्या आदिवासी भागासाठी शेवगा हे पिक मिसर्गाचे वरदान आहे . त्यामुळे त्याच्या रोजच्या आहारात जिवनसत्वे युक्त सकस असा आहार प्राप्त होतो. आदिवासी भागात शेवगा ह्या पिकास शेगुट या स्थानिक नावाने ओळखतात.

भाजीचा ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video of vegetable