काटेसावर

By:

योगेश नवले

पाडा / Pada/ Hamlet

देवगाव

खेडे / village

देवगाव

तालुका / Taluka / Block

अकोले

जिल्हा / District

अहमदनगर

राज्य / State

महाराष्ट्र
Photograph of the tree

वृक्षाची माहिती व उपयोग / Details of tree and its uses

“काटेसावर” पळस,पांगारा फुलल्यानंतर ‘काटेसावरही’ वसंत ऋतूच्या स्वागताला नटून थटून येते.काटेसावर हे झाड मोठ्यावृक्षामध्ये मोडते.यांची उंची पंचवीस ते तीस मीटरपर्यंत असू शकते.डिसेंबर/जानेवारी मध्ये या वृक्षाची पांगारा प्रमाणेच पूर्ण पानगळ होते.या झाडाच्या संपूर्ण फांद्यावर गोलगोल काटेअसतात.पानगळीनंतर छोटी-छोटी बोंडे येऊन असंख्ये मनमोहक लालबुंद फुले उमलतात.एकदा का हे झाड फुलायला लागले की सर्वच पक्षांना व कीटकांना आकर्षित करते. फुलातील मध(मकरंद)शोधण्यासाठी असंख्ये मधमाशा तसेच कीटक येतात(चित्र पहा) पक्षांची तर शाळाच या वृक्षावर भरते.पोपट,साळुंकी,मैना,कोकिळा,कोतवाल,कावळा,बुलबुल तसेच अनेक छोटेछोटे पक्षी या झाडाजवळ येऊन किलबिलाट करतात. शेताच्याबांधावर,डोंगरदरयात,गडकिल्ल्यांच्याजवळ,खेडेगवाजवळ काटेसावर पाहायला मिळते. काटेसावरीच्या फळाला ग्रामीण भागात “सायरधोडे” असे म्हणतात.कोवळ्या फळांची भाजी करतात.फळ पक्व झाल्यानंतर अपोआप उमलून त्यातून कापसासारखे तंतू वार्याने उडतात त्यात असंख्ये बिया असतात. उन्हाळ्याची चाहूल लागली कि आपण सांगायला लागतो.. पाखरांसाठी पाणी ठेवा! पण आपण ठेवलेले पाणी ही पाखरे पितात का? उन्हाळ्यात ज्या ज्या वेगवेगळ्या वृक्षाना बहार येतो त्यातली एक म्हणजे काटेसावर. भडक लाल-गुलाबी रंगाच्या चांगल्या मुठभर आकाराच्या फुलांनी बहरलेली सावर म्हणजे रानातील रसवंतीगृह. पक्ष्यांना, भुंग्यांना, खारुताई सारख्या पिटुकल्या प्राण्यांना आणि माश्यांना अप्रतिम गोड रसाची मेजवानीच. सावरीचे फुल तोडून उलटे केले तर त्यात पुष्कळसे पाणी आत असते. म्हणजे आपल्यालाही खरच पक्ष्यांच्या तहानेची काळजी असेल तर, ही सावरीची झाडे जागोजागी लावायला काहीच हरकत नाही. आपण असलो नसलो तरी उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी जरूर मिळेल.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video